रोहित पवार ‘खडकवासला’ विधानसभा लढणार ?

6 1,308

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि युवा नेते रोहित पवार नेहमीच माध्यमांच्या चर्चेचा विषय  राहिले आहेत मग तो पवार साहेबानं सोबतचा दौरा असो, सोशल  मीडिया वरील ट्रोलर्सला चोख प्रत्योत्तर  किंवा जामखेडचे वाढलेले दौरे असोत, रोहित पवार हे अल्पावधीतच तरुण, युवा – उद्योजकांच्या पसंतीस उतरलेलं नेतृत्व आहे.  रोहित पवार विधानसभा लढणार हे नक्की असलं तरी मतदार संघ कोणता असणार या बाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, कर्जत – जामखेडच्या जागेवरून आत्तापासूनच आघाडीमध्ये कुरबुर सुरु झालेली आहे या पार्श्वभूमीवर  पुण्यातील खडकवासला मतदार संघातील राजकीय स्थिती पाहता हा मतदारसंघ देखील त्यांच्या साठी योग्य पर्याय ठरू शकतो. 


सध्याची स्थिती 
शहरी आणि ग्रामीण भाग असलेला हा विधानसभा मतदार संघ आहे. यंदा  भाजपच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कूल यांना तब्बल ६० हजार मतांचे लीड देण्याची किमया करून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखविण्याचे काम केले आणि युती झाल्यास गड विद्यमान आमदार भीमराव तापकीर हेच राखणार याची झलक पण दाखविली. 


दिग्गज नेत्यांची मांदीयाळी, गटबाजीचं ग्रहण 
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या मतदार संघाचं नेतृत्व करतात त्यामध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक विकास दांगट, काका चव्हाण, नगरसेवक सचिन दोडके, महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा समावेश आहे.  विधानसभा लढण्याची यातील अनेकांची इच्छा लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे देखील पुरेसे संख्याबळ असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक नेत्याचा प्रभाव असलेले काही भाग आहेत आणि केलेली कामे सुद्धा आहेत, पण अंतर्गत गटबाजीमुळे खडकवासला राष्ट्रवादीच्या हातामधून गेला आहे हे पक्षातील अनेक नेते खासगी मध्ये कबुल करतात. त्यामुळे या सगळ्यांची सांगड घालून सर्वांना एकत्र घेऊन जाणारा उमेदवाराचं भाजप सेनेसमोर मोठं आव्हान उभं करू शकतो. 

पवार’ फॅक्टरच पॉवरफुल

  अंतर्गत गटबाजी जरी असली तरी ‘पवारांना’ मानणारे हे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मोठावर्ग या भागात आहे. खरंच पवार साहेब, सुप्रियाताई, अजितदादा यांनी ‘रोहित पवार’ यांचं नाव लावून धरल्यास गटबाजी विसरून  मतदार संघातील दिग्गज नेत्यांसोबतच, युवा वर्गाची मोठी ताकद ‘रोहित पवार’ यांच्या मागे उभी राहू शकते. उद्योजक व  रोहित  पवार यांचे सासरे सतीश मगर यांना देखील मानणारा मोठा वर्ग नांदेड गाव आणि परिसरात असल्याचा फायदा देखील रोहित पवार यांना होऊ शकतो.  ग्रामीण भागातील काही नाराज मंडळी पण त्यांच्या नावाला विरोध न करता ‘पवार’ साहेबांचा मान ठेवण्याकरता पुन्हा  मैदानात उतरू शकतात, म्हणून पवार फॅक्टरच पॉवर फुल असणार यात शंका नाही. 


युवा नेतृत्व आणि साहेबांची  तिसरी पिढी 
रोहित पवार यांच पुण्यातच नाही तर सबंध महाराष्ट्रात एक वलय निर्माण झालं आहे. उत्तम वक्तृत्व, दांडगा जनसंपर्क या त्यांच्या महत्वाच्या बाजू असून, संयमी आणि संवेदनशील युवा नेता म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात, एकंदरीतच रोहित पवार हे प्रस्थापितांपुढे आव्हान उभे करण्यासाठी आणि राष्ट्रवादी पुन्हा आणण्यासाठी एक तुल्यबळ उमेदवार असू शकतात. 


आता  रोहित पवार येथून लढणार का ? राष्ट्रवादी रोहित पवारांसाठी खडकवासल्याच्या पर्याय निवडणार कि कर्जत-जामखेडसाठीच काँग्रेसवर आणखी दबाव टाकणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.  

Leave A Reply

Your email address will not be published.

6 Comments
  1. Cebrany says
  2. Cebrany says
  3. Cebrany says
  4. replica dior jacket says

    585669 549973An fascinating discussion might be worth comment. I feel you ought to write on this topic, it might undoubtedly be a taboo subject but typically folks are not enough to dicuss on such topics. To a higher. Cheers 770431

  5. Cebrany says
  6. Cebrany says

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!