रायगड जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’ स्थापन करणार – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

2 339

अलिबाग,दि.14 – करोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषत : पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठे येथे तात्काळ ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार,आरोग्य मंत्री ना.श्री.राजेश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चे अंती टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
या टास्क फोर्समध्ये नामवंत तज्ञ डॉक्टरांचा समावेश राहणार असून कोविड रूग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था, उपचार पद्धती यावर आणि अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेख ठेवणार आहे, आवश्यक तसा सल्लाही देणार आहे. या टास्क फोर्सला ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञ व आरोग्य सहसंचालक डॉ.तात्याराव लहाने यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. 
या माध्यमातून करोनावर मात करणे व नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे. शासन-प्रशासन करोना विरुद्ध लढताना नागरिकांची सर्व प्रकारे काळजी घेत आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. शासन आपली जबाबदारी घेत आहे, आपण खबरदारी घ्यावी. घराबाहेर जावू नये, घरातच राहावे,असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगडवासियांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. sbo says

    407462 154430I will correct away grab your rss feed to remain up to date on any succeeding articles you might write 828519

  2. eBay music sale says

    146938 912338In fact your creative writing skills has inspired me to get my own blog now. Actually the blogging is spreading its wings rapidly. Your write up is a good example of it. 457885

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!