पोलिसांच्या सन्मानार्थ लोगो डीपी ठेवा – गृहमंत्री अनिल देशमुख
सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा, असे म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना महाराष्ट्र पोलीसचा लोगो डीपी ठेवण्याचे आवाहन केले आहे. #पोलिसांनासाथ_कोरोनावरमात असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे.