सलाम..! वाचवले पुरात झाडावर अडकलेल्या ३४ माकडांचे प्राण

68

अमरावती :  मुक्या प्राण्यांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टिमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी वाढली पण त्यामुळे माकडांची एक टोळी झाडावरच अडकली हि बाब लक्षात येताच आपत्ती व्यवस्थापन टिम ला पाचारण करण्यात आले. 

अमरावती जिल्ह्यातील सामदा काशीपूर येथील धरणातील मध्यभागी झाडावर अडकून पडलेल्या माकडांच्या टोळीची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या रेस्क्यू टीमने सुटका केली आहे . शोध व बचाव टिमने  सलग 3 दिवसांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर धरणाच्या मध्यभागी असणाऱ्या झाडावरील 34 माकडांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून जीवनदान दिले आहे. 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.