स्मार्ट सिटी, नक्की जागृत किती ?

पुणेकरांची मतदानाकडे पाठ

1772
विविध कारणाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने ”स्मार्ट सिटी,नक्की जागृत किती.?” हा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पुण्यात
४३.६३ % मतदान झाले आहे जी प्रशासन आणि राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब आहे.
उन्हाचा वाढता तडका, मतदार केंद्राची माहिती न मिळणे, यादीमध्ये नाव नसणे आदी प्रमुख कारणे यावेळी समोर आली आहेत. लोकशाहीचा हा महोत्सव सामान्य नागरिकांमध्ये पोहोचवा या करीता  प्रशासनाचे सुनियोजन , राजकीय कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना त्यासोबतच नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. नेहमीच आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पुणेकरांनी आपल्या प्रथम कर्तव्याची जाणीव ठेवणे देखील महत्वाचे आहे, पण घसरलेल्या या टक्क्यामुळे निकालावर देखील परिणाम होणार  आहे.  दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्टेच्या या लढतीमध्ये विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!