पोलीस बॉईज संघटना ( महाराष्ट्रराज्य ) ‘शिवसंग्राम’मध्ये विलीन

आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश, शिवसंग्रामची ताकद वाढणार.

8 425
आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्षामध्ये पोलीस बॉईज संघटना सामील झाली असून शिवसंग्रामच्या मुंबई कार्यालयात आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे, शैलेश पांडव  यांच्यासमवेत संघटनेच्या महाराष्ट्रातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  शिवसंग्राम मध्ये प्रवेश केला.
“पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांसाठी काम करत असताना, पोलिस आणि पोलीस यंत्रणा बदनाम होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे, तुम्ही शिवसंग्रामवर जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. पोलीस बॉईज संघटनेच्या समावेशाने शिवसंग्रामची ताकद वाढली असून पुढील काळात त्याचा नक्कीच फायदा होईल” असा विश्वास मेटे यांनी या वेळी व्यक्त केला. यावेळी मुंबई शिवसंग्रामचे अध्यक्ष दिलीप माने, सी.ए. जाधव आणि संजय पवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.