‘बिग बॉस मराठी’ : केतकी माटेगावकर चा खुलासा

8 345

‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या पर्वात कोण कोण मराठी कलाकार सहभागी होणार या बाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या  नावाचीदेखील चर्चा जोरात सुरु आहे, मात्र याबाबत केतकीनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिने इंस्टाग्रामवर एका पोस्ट मध्ये सांगितले आहे की, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची वेळ जवळ आली आहे. मला बिग बॉस पहायला आवडते आणि मी दुसरा सीझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही अफवा आहे. मोठ्या काळ चालणाऱ्या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा विचार नाही. या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट.

#rumour #nottrue

Posted by Ketaki Mategaonkar on Sunday, March 31, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.