‘तटकरे विरुद्ध तटकरे’ फॉर्म्युला यंदा फेल

0 1,109

रायगड: रायगडमध्ये मागील (२०१४ ) लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा अवघ्या २ हजार ११० मतांनी पराभव झाला होता आणि तोही तटकरेंमुळेच, कारण त्यांच्या विरोधात नामसाधर्म्य असलेले उमेदवार सुनील श्याम तटकरे यांना तब्बल ९ हजार ८४९ मते मिळाली होती. हा पराभव सुनील तटकरे यांच्या जिव्हारी लागला होता. 

यंदा ( २०१९ ) सुद्धा सुनील तटकरे यांच्या विरोधात १ नाही तर २ नामसाधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले ते म्हणजे सुनील पांडुरंग तटकरे ज्यांना ४ हजार १२६ मते  आणि सुनील सखाराम तटकरे ९ हजार ७५२ मते यंदाच्या निवडणुकीत मिळाली ज्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे मताधिक्य १३ हजार ८७८ मतांनी कमी झाले, नाहीतर ३१ हजार मतांचा सुनील तटकरेंचा लीड १३ हजार मतांनी वाढला असता. असो पण विरोधकांचा तटकरे विरुद्ध तटकरे फॉर्म्युला यंदा फेल झाल्याचे दिसून आले. 

Leave A Reply

Your email address will not be published.