शिवसंग्राम रोजगार – व्यवसाय मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न, आ. मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

1561 6,002

बीड : आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार व  व्यवसाय मार्गदर्शन  मेळावा बीड शिवसंग्राम भवन येथे उत्साहात संपन्न झाला. जे. सी.  व्हेंचर या नामांकित कंपनीसाठी पदवीधर असणाऱ्या तरुण तरुणींसाठी शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे  बीड उपाध्यक्ष  अक्षय माने आणि शहराध्यक्ष सौरभ तांबे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसंग्रामचे नेते रामहरी मेटे, अनिल घुमरे, पं. सभापती कोकाटे, नारायण काशीद, शहराध्यक्ष सुभाष सपकाळ, शेषेराव तांबे, दत्ता गायकवाड, गणेश धोंडरे, मुजफ्फर चौधरी, शेख आबेद भाई, शेख कुतुब भाई, सतीराम ढोले, गंगा भोसले व नवनाथ काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. 
मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट पाहता, बेरोजगारी हि भविष्यातील मोठी समस्या असू शकते, अशा परिस्थितीत कोणता व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो याबद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विविध भागातून सहभागी झालेल्या तरुण तरुणींमधून २२ जणांना जे सी व्हेंचर मार्फत प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये निवडकरून रोजगार देण्यात आला आहे. शिवसंग्राम विधार्थी आघाडीच्या उपक्रमाचे कौतुक अनेक उपस्थितांनी यावेळी केले. 

Leave A Reply

Your email address will not be published.