भिवंडी कामतघर मार्केट अखेर बंद !

216 1,514

गेली काही दिवसया मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असलेले आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरु असलेले गणेश मंदिर, ताडाळी रोड कामतघर भिवंडी येथील हे भाजी मार्केट अखेर आज बंद करण्यात आले.

फर्स्ट महाराष्ट्र टीम गेली दोन दिवसापासून सदर घटनेचा पाठपुरावा करत होती, याची दखल घेत स्थानिक प्रशासन यांनी आज मार्केट परिसरात जाऊन सर्व वितरकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. कामतघर मार्केट दिनांक 25 26 एप्रिल रोजी बंद राहणार असून ते दि. 27 एप्रिलला दोन तासासाठी सुरु ठेवण्यात येईल. दिनांक 28 29 30 एप्रिल रोजी मार्केट पुन्हा बंद असेल, कृपया याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व विनाकारण घराबाहेर निघू नये अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

व्हीडीओ : भिवंडी, ठाणे जिल्हा दि. 2३ एप्रिल २०२० सकाळी ८ वाजून ५ मिनिटे

भिवंडी स्थानिक प्रशासन, ठाणे जिल्हा अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, महापौर कोणी जवाबदारी घेणार आहे का? ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आज सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी काढलेला हा विडीयो गणेश मंदिर, भाजी मार्केट ताडाळी रोड कामतघर या परिसरातील आहे. लॉक डाऊन मध्ये अशी स्थिती असेल तर कोरोनामुक्त महाराष्ट्र कसा होणार ? CMOMaharashtra Eknath Sambhaji Shinde Saheb Fan Club महापौर सौ. प्रतिभा विलास पाटील @Anildeshmukh Bhiwandi, Mumbai @Thane Collectorate

Posted by First Maharashtra on Wednesday, 22 April 2020

Leave A Reply

Your email address will not be published.